


पिंपरी, ता. २८: पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख, विशाल नगर, जगताप डेअरी परिसरात असलेल्या साई इन व ओयो या हॉटेलमध्ये काही दिवसांपासून अवैध व गैरप्रकारचे व्यवसाय सुरू आहेत.

या अवैध व्यवसायाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या ठिकाणी सतत संशयास्पद हालचाली होत असून परिसरातील नागरिक, महिला व विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
अवैध व्यवसायबाबत २७ ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार केली आहे. तरी पोलीस आयुक्तांनी त्वरित याची सखोल चौकशी करून अवैध व्यवसाय बंद करून बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा नागरिकांना जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारणार लागेल.
~ तुषार गजानन कामठे, शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), पिंपरी चिंचवड शहर जिल्हा

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
