Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘२०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे!’ – अशोक वानखेडे
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘२०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे!’ – अशोक वानखेडे

suwarna gaware 11/05/2025
dacbfefc-685f-4acf-9676-90be4ca5e067
Spread the love


शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प चौथे


पिंपरी (दिनांक : ११ मे २०२५) ‘२०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे; तर महाराष्ट्रात आता पेशवाई सुरू झाली असून विरोधक बेजबाबदार आहेत!’ असे परखड प्रतिपादन दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (टायगर) यांनी शनिवार, दिनांक १० मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भारतीय संविधान : भारताची दशा आणि दिशा! (नेहरू ते मोदी)’ या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना अशोक वानखेडे बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते; तसेच प्रसाद शेट्टी, बापू गायकवाड, विजय गायकवाड, आर. जी. गायकवाड, मयूर काळभोर, सुप्रिया सोळांकुरे, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, ‘व्याख्यानमाला समन्वय समितीच्या वतीने शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमाला चालविण्यात येते. अनेक नामवंत वक्त्यांनी या व्याख्यानमालेत प्रबोधन केले आहे. दिल्लीतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे विचार ऐकण्याची संधी आज मिळाली.

त्या आनंदाप्रीत्यर्थ महात्मा फुले यांची पगडी त्यांना परिधान करून सन्मानित करीत आहोत!’ अशी भावना व्यक्त केली. मानव कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘देशात स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या समता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना गेल्या अकरा वर्षांत खीळ बसली आहे. अभिव्यक्तीची मुस्कटदाबी होत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी अशा व्याख्यानांची गरज आहे!’ असे मत मांडले.

अशोक वानखेडे पुढे म्हणाले की, ‘देशासाठी सैनिक लढत असताना शासनाला साथ द्यावी, असे संकेत आहेत; परंतु युद्धबंदी जाहीर झाल्यावर मी सत्तेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आता वापरू शकतो. राज्यघटनेचा सांगाडा बदलण्याचे प्रयत्न २०१४ पासून सुरू झाले आहेत. सत्तारूढ पक्षाचा एक खासदार जाहीरपणे न्यायपालिकेवर भाष्य करतो. उपराष्ट्रपती यांनी आपल्या पदाची गरिमा ठेवली पाहिजे.

बिल्कीस बानोवरील सामूहिक अत्याचार का होतात? त्यातील दोषींची सुटका झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते त्यांचा जयजयकार करतात, ही कोणती मानसिकता आहे? निवडणूक आयोग नि:पक्षपणे काम करीत नाही. शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी आहे; कारण सरकार निर्लज्ज आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या खिशातून देत नाहीत. लवकरच आपली श्रीलंकेसारखी अवस्था होणार आहे.

निवडणूक आली की पंतप्रधान घोषणा करणार आणि आपण टाळ्या वाजवणार, ही परिस्थिती बदलली पाहिजे. ‘मन की बात’ वाल्यांनी आता जन की बात केली पाहिजे. पहलगाम युद्धाचेही आता राजकीय भांडवल केले जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानातील अधिकार आम्ही वापरणार आहोत की नाही? जर आम्ही सरकारला जाब विचारणार नसलो तर शाहू – फुले – आंबेडकर यांचे नाव घेण्याचा आम्हाला अधिकार नाही!’

दिगंबर बालुरे, राजन नायर, प्रदीप पवार यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र बनसोडे यांनी आभार मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 51
Tags: #ashok vankhede Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: चिखली-पाटीलनगर येथील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचे स्थलांतर!
Next: ग्रंथदिंडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘प्रेरणा पुरस्कार’ वितरण सोहळा पिंपरी – चिंचवड येथे संपन्न

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.