


पिंपरी, ता. ४ : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई आयोजित हार्मोनियम व गायनाच्या प्रारंभिक परीक्षेत शौनक भालेकर याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत प्राविण्य मिळविले.

त्याच्या यशाबद्दल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संचालक अभय टिळक, राजू महाराज ढोरे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी संगिता बांगर,
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे यांच्यासह संतपीठातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शौनक सध्या संगीत शिक्षणाचे धडे संगीत विशारद विलास महाराज कोकाटे यांच्याकडे घेत आहे.
त्याच्या यशाबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी शौनकचे अभिनंदन केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
