


पिंपरी, ता. ३०: डीएमके स्कुलचा क्रीडा दिन पार पडला. दापोडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजू भास्कर यांच्या हस्ते क्रीडा दिनाचे उदघाटन झाले.

खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकास होतो. निर्णयक्षमता , सहानुभुती , शिस्तीची भावना निर्माण होते आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो. हे मोलाचे विचार दापोडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर यांनी विद्यार्थी आणि पालकांसमोर मांडले.
यावेळी DMK school चे डायरेक्टर अतुल दौंडकर, मयूर मूथा, मोनिका कर्णावट, ममता कांबळे हे उपस्थित होते.तसेच विद्यार्थ्यां बरोबर पालक ही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा क्रीडा दिन यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी ,तसेच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
